Sunday, July 25, 2021

बोध सूर्यफुलाचा Sunflower:

   


सूर्यफुल   Sunflower:

  सूर्यफूल तर सर्वांना माहीतच आहे पण कोणी विचार केला आहे का त्या झाडाची फुले एकमेकांसमोर का येतात ?ती एकमेका समोरच का असतात? त्या झाडापासून आपल्याला काय बोध मिळतो ? हे थोडं समजून घ्या 

जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्यफुल आपले तोंड त्या दिशेने करीत असतो .म्हणजेच सूर्यप्रकाश समोरून ग्रहण करीत असतो हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. पण या बाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहीत नाही पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्णपणे झाकला जातो ,त्यावेळी काय घडते ?तुम्हाला वाटेल कि ती फुलं मिटत असतील  किंवा जमिनीकडे तोंड करत असेल नाही का? नाही तर काय घडते त्यावेळी ही फुले खाली किंवा वरती वळत नाही .ती समोरासमोर वळतात एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी ,इतरांनाही जागवण्यासाठी. निसर्गाचं परिपूर्णतेचा वरदान खरंच आश्चर्यकारक आहे .माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया  आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे .समाजात अनेक लोक काळजीने ,चिंतेने ,परिस्थितीने ग्रासलेले असतात तेव्हा या सूर्यफुलाचा बोध घेतला पाहिजे, उपयोगात आणला पाहिजे .

जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे मनोबल वाढवणे होय .असे सर्वांनी सूर्य फुलासारखे {Sunflower }वागून संकटाच्या ,निराशेच्या ढगाळ  वातावरणात एकमेकांना साथ देऊन आपल्या चांगुलपणाची साक्ष दिली पाहिजे  .असे वागल्याने एकमेकांना एक दुसऱ्या मध्ये मानवतेचे दर्शन होईल 


Friday, July 23, 2021

सर्दी कमी करण्यासाठीचे उपाय



जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर ती सर्दी कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपचार पाहणार आहोत


  • सर्वप्रथम रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपण्याच्या एक तास आगोदर एक दीड ग्लास पाणी प्यावे झोपण्याच्या दहा मिनिटे अगोदर शंभर ग्रॅम गूळ खावा  गुळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने तुमची सर्दी कमी होईल व तुम्हाला सकाळी सर्दी कमी वाटेल  

  •  शुगर डायबिटीस असलेल्यांनी हा उपाय करू नये 

  • दररोज सकाळी सात ते आठ तुळशीची पाने व दोन-तीन काळेमिरे आल्यानेही सर्दी-पडसे कमी होते


 ज्यांना वारंवार सर्दी-पडसे होत असेल त्यांच्यासाठी एक छानसा उपाय:

  •  ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या दिवशी संध्याकाळी साधे हलके जेवण करावे.त्याआधी दोन-तीन दिवस मसालेदार व तळलेले पदार्था खाऊ नये.संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून कुटावे. त्यात थोडे तूप आणि कणिक मळावे त्याची जाड पोळी लाटून तव्यावर  शेकावी .चांगली भाजल्यानंतर गरम गरम खावी व त्यानंतर पाणी पिऊ नये यामुळे तुमची सर्दी कायमची कमी होईल 

Thursday, July 22, 2021

चुकूनही दिवसातील ‘या’ वेळी करू नका काकडीचे सेवन अन्यथा होऊ शकते गंभीर नुकसान, या लोकांना आहे जास्त धोका!

 




काकडीची चव आणि त्याचे फायदे या दोन्ही गोष्टींशी आपण कदाचित परिचित असालच. पण तुम्हाला माहिती आहे का काकडीचे चुकीच्या वेळी सेवन केल्यास बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. माहित नसल्यास जाणून घ्या महत्वाची माहिती.





जेव्हा जेव्हा निरोगी राहण्याचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा त्यामध्ये भाज्यांचा उल्लेख सर्वात प्रथम येतो. कारण आपण भाज्यांच्या सेवनाने फक्त निरोगीच राहत नाही तर बर्‍याच आजारांवर मात करून लवकर बरं देखील होऊ शकतो. असंच काहीसं काकडी बद्दलही म्हटलं जातं. तसं पाहायला गेलं तर काकडी शिवाय कोशिंबीर हा पदार्थ अपूर्ण आहे आणि तसं का असू नये? कारण काकडीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन के आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम दर्शवितात. एकंदरीत काकडी ही एक अशी भाजी आहे की ज्याचा वापर आपण चटणी, कोशिंबीरी, सॅलेड तसेच सूपमध्ये सुद्धा करू शकतो.





एवढेच नाही तर काकडी त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. पण काकडीचे फायदे त्याच्या प्रमाणावर आणि वेळेवर अवलंबून असतात. जर आपण काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले किंवा चुकीच्या वेळी सेवन केले असेल तर यामुळे आपणास बरीच हानी पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊया यामुळे नेमकं काय व कोणाला नुकसान होतं?
काकडीचं अतिप्रमाणात सेवन



वाडवडिलांनी नेहमी असं म्हटलं आहे की कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणं वाईटच असतं. जरी काकडी हा अनेक गुणांचा खजिना असली तरीही जर तुम्ही काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते पोट फुगण्या सारख्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकतं. कारण काकडीत 95 टक्के पाणी असते. इतकेच नाही तर काकडीच्या बियांमध्ये कुकुरबिटिन नावाचा घटक आढळतो. या घटकामुळे आपल्याला अधिक वेळा लघुशंका होणं सुरू होतं. ज्यामुळे आपल्या शरीरातून लिक्विड किंवा द्रव पदार्थ अधिक प्रमाणात बाहेर पडू लागतात. असे झाल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू लागते. पण याव्यतिरिक्त काकडीचे सेवन योग्य प्रमाणातच केले तर ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. पण जास्त किंवा अतिप्रमाणात याचे सेवन केल्याने आपल्याला डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते.

Sunday, July 18, 2021

​डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठीचे उपाय

तुमच्या डोळ्याखाली अतिप्रमाणात काळे पणा असेल तर  ते कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहू 

  • डोळ्याखाली काळे पणा होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात .मानसिक तणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार, जास्त  कामाचा ताण  यामुळेही तुमच्या डोळ्याखालील काळे पणा  वाढू शकतो ही कारणे जर तुम्ही दूर केली तर डोळ्याखालील काळे पणा हळू हळू कमी होईल

  •  दुधाची साय दररोज डोळ्याखाली लावल्याने याचा फायदा होईल

  •  कच्चा बटाटा मधोमध कापून अर्धा तास डोळ्यावर ठेवावे नंतर ते  धुऊन टाकावे 

  • गाजर किसून लावल्यानेही काळपटपणा दूर होईल असे पंधरा ते वीस दिवस करावे

  •  काकडीच्या गोल चकत्या करून त्या डोळ्यावर ठेवाव्या त्यामुळे डोळ्याला थंडावा लागेल व काळा घेर कमी होईल

  • तसेच  गुलाब जल वापरल्याने ही डोळ्याखालचे काळे पणा दूर होईल

Friday, July 16, 2021

चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी घरचे उपाय :

 

                    जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे होत असेल तर त्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहू

 

  •  आटवलेले दूध घेऊन त्यामध्ये एका लिंबाचा रस टाकुन चांगले मिश्रण तयार करावे हे मिश्रण रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवावे व सकाळी धुऊन टाकावे या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होऊन चेहरा फ्रेश होईल

  • .शंभर ग्राम संत्र्याची साले चांगले वाळवून त्याचे पावडर करावे त्यामध्ये 500 ग्राम बाजरीचे पीठ आणि 12 ग्राम हळद टाकून भिजत ठेवावे  नंतरं थोड्यावेळाने ते चेहर्‍यावर लावावे दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. काही दिवसातच तुमचा चेहरा सुंदर टवटवीत होईल

  •  मसूर डाळीचे पीठ दुधामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावावे दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा हा उपाय सकाळ संध्याकाळ आठवडाभर केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होईल

  •  बीट ,गाजर व टोमॅटो यांचा रस सारख्या प्रमाणात घेऊन रोज प्यावा हा प्रयोग दोन महिन्यापर्यंत केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम व सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल

  •  गाळलेला लिंबाचा रस ,दोन तोळे गुलाब अर्क, दोन तोळे गलिसरिन व्यवस्थित मिसळून एका बॉटलमध्ये भरून ठेवावे रात्री झोपताना ते चेहऱ्यावर लावावेअसे वीस दिवस केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम, फुटकुळ्या कमी होईल नंतर तुमची  त्वचा मऊ  व सुंदर होईल

Read Also: site srweb.in

Thursday, July 15, 2021

चेहऱ्यावरचे काळे डाग व सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

   

चेहऱ्यावरचे काळे डाग व सुरकुत्या

            आपला चेहरा नेहमी सुंदर आणि ताजे तजेलदार हवा असे सर्वांना वाटते.कोणत्याही कार्यक्रमात जाताना आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटते .पण चेहर्‍यावर नेहमी काळे डाग व पिंपल्स असतात ते दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.  


  • ज्यांच्या चेहर्‍यावर नेहमी मुरूम,काळे डाग व फुटकुळ्या होतात त्यांनी एक उकडलेला बटाटा घेऊन सालासगट वाटून घ्यावा.

  •  त्यामध्ये काकडीचा रस व लिंबाचा रस टाकून त्याचे मिश्रण तयार  करून लेप लावावे 

  •  नंतर तासाभराने धुऊन टाकावे 

  • असा प्रयोग काही दिवस केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे डाग निघून जातील 

  •  चेहऱ्यावरचा काळसरपणा कमी करण्यासाठी एक एक चमचा  व्हिनेगार मध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे घ्यावे

  •  ते चांगले मिसळावे 

  • नंतर या मिश्रणाचा लेप पंधरा मिनिटे लावून ठेवावा. 

  • नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 

  • असा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करावा.

  •  चेहऱ्यावरचे डाग व सुरकुत्या कमी करण्यासाठी पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर  लावावा.

  •  नंतर दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा

  •  थोड्याच दिवसात चेहरा सुंदर दिसेल 

जीनी और आदमी

 



                  एक गांव में एक आदमी रहता था उसका का नाम शंकर था वह खेती करता था. वह एक बार रात में खेत से आ रहा था. तब उसे चलते-चलते रास्ते में प्यास लगी. उसे पास में ही एक बोतल  पड़ी मिली. उस बोतल को खोला. तब ही उसमें से  सफेद धुआं निकला.उस आदमी  को वह बहुत बड़ा जिनी दिखाई दिया.तभी वह जिनी खुशी से चिल्लाने लगा जोरो जोरो से हंसने लगा. उसने उस आदमी से कहा कि तुमने मुझे आजाद किया है. मैं हमेशा तुम्हारा शुक्रगुजार रहूंगा. अब से मैं तुम्हारा कहां हुआ मानूंगा.

              तब वह आदमी बहुत घबराया और वह सोच में पड़ गया अब मैं क्या करूं तब उसने एक शक्ल लड़ाई.और उस आदमी ने जीनी से कहा कि तुम इतने बड़े हो कि इस बोतल में जा नहीं पाओगे. तभी वह जिनी जोरो से हंसने लगा और उस आदमी से कहा तुम्हें मुझ पर भरोसा नहीं है. ठीक है अब मैं तुम्हें उस बोतल में जाकर दिखाऊंगा. और वह जिनी उस बोतल में चला गया. तभी उस आदमी ने बोतल का ढक्कन उठाया और उस बोतल को बंद कर के दूर नदी में फेंक दिया. इस तरह उस आदमी ने जीनी से अपनी जान बचाई



 सीख: हमें हमेशा होशियारी से काम लेना चाहिए .