Sunday, August 12, 2018

बैल पोळ्याबद्दल माहिती – Bail Pola Information in Marathi


आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे . आपल्या देशात विविधतेत एकता नटलेली आहे. विविध प्रांतात विविध प्रकारच्या भाषा, वेशभूषा ,सण, उत्सव साजरे केले जातात.त्यातच आपल्या महाराष्ट्राचा एक खास आणि मोठा सण .तो म्हणजे शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात रात्रंदिवस घाम  गाळणाऱ्या बैलांचा सण.तो सण म्हणजे बैलपोळा होय. या सणाबद्दल मी माझ्या परीने थोडीशी माहिती टाकण्याचा प्रयत्न करणार आहे .कोठे काही चुकले तर माफ करा आणि तुम्हाला काही माहीत असेल तर तेही सांगा. 

 पोळा सण कोठे साजरा केला जातो? 

       हा सण विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. यात विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी जास्त प्रमाणात साजरा करतात .या दिवशी बळीराजा आपल्या बैलांची पूजा करतो. 

पोळा हा सण केव्हा येतो? 

          हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो .इंग्रजी महिन्यानुसार हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. यावेळी पोळा हा सण सहा सप्टेंबर रोजी आला आहे. 

 हा सण कसा साजरा करतात? 

         या सणाच्या दोन दिवसा अगोदरच बैलांना शेतीच्या कामापासून सुट्टी मिळते .त्यांचे खांदे मळणी केली जाते. या दिवशी बैलांना छान पैकी नदीवर किंवा तलावावर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यांच्या  शिंगांना छान पैकी  गेरूने रंगवले जाते. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते . शिंगावरती रंगबिरंगी फुगे बांधली जातात .गळ्यात घागर माळा, कवड्याची माळ किंवा हार घातले जातात.मग शेतकऱ्याची बायको बैल राजाची पूजा करते. 

          सकाळच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते.वेशीच्या पटांगणात बैल पोळा भरविला जातो. त्यात वयस्कर बैलाला बैलाच्या शिंगाला आंब्याच्या दोरांनी मखर बांधलेला असतो.तो मानाचा बैल असतो. त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना ओळीने उभे केले जातात.त्यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. नंतर मग बैल पोळा फुटतो.काही गावांमध्ये तर जत्रा भरली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात. 

      या दिवशी  घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. बैलपोळा सुटल्यानंतर बैलांची पूजा  करतात. नंतर त्यांना नैवद्य दिला जातो.अशाप्रकारे बैल पोळा हा सण शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा सण आहे .अशीच आपली परंपरा, आपली संस्कृती जपून ठेवूया आणि महाराष्ट्र धर्म वाढवूया

Read also: Sarkari yojana

 

Read also: Sarkari Govt yojana

No comments:

Post a Comment