Sunday, July 25, 2021

बोध सूर्यफुलाचा Sunflower:

   


सूर्यफुल   Sunflower:

  सूर्यफूल तर सर्वांना माहीतच आहे पण कोणी विचार केला आहे का त्या झाडाची फुले एकमेकांसमोर का येतात ?ती एकमेका समोरच का असतात? त्या झाडापासून आपल्याला काय बोध मिळतो ? हे थोडं समजून घ्या 

जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्यफुल आपले तोंड त्या दिशेने करीत असतो .म्हणजेच सूर्यप्रकाश समोरून ग्रहण करीत असतो हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. पण या बाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहीत नाही पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्णपणे झाकला जातो ,त्यावेळी काय घडते ?तुम्हाला वाटेल कि ती फुलं मिटत असतील  किंवा जमिनीकडे तोंड करत असेल नाही का? नाही तर काय घडते त्यावेळी ही फुले खाली किंवा वरती वळत नाही .ती समोरासमोर वळतात एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी ,इतरांनाही जागवण्यासाठी. निसर्गाचं परिपूर्णतेचा वरदान खरंच आश्चर्यकारक आहे .माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया  आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे .समाजात अनेक लोक काळजीने ,चिंतेने ,परिस्थितीने ग्रासलेले असतात तेव्हा या सूर्यफुलाचा बोध घेतला पाहिजे, उपयोगात आणला पाहिजे .

जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे मनोबल वाढवणे होय .असे सर्वांनी सूर्य फुलासारखे {Sunflower }वागून संकटाच्या ,निराशेच्या ढगाळ  वातावरणात एकमेकांना साथ देऊन आपल्या चांगुलपणाची साक्ष दिली पाहिजे  .असे वागल्याने एकमेकांना एक दुसऱ्या मध्ये मानवतेचे दर्शन होईल 


No comments:

Post a Comment