Thursday, July 22, 2021

चुकूनही दिवसातील ‘या’ वेळी करू नका काकडीचे सेवन अन्यथा होऊ शकते गंभीर नुकसान, या लोकांना आहे जास्त धोका!

 




काकडीची चव आणि त्याचे फायदे या दोन्ही गोष्टींशी आपण कदाचित परिचित असालच. पण तुम्हाला माहिती आहे का काकडीचे चुकीच्या वेळी सेवन केल्यास बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. माहित नसल्यास जाणून घ्या महत्वाची माहिती.





जेव्हा जेव्हा निरोगी राहण्याचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा त्यामध्ये भाज्यांचा उल्लेख सर्वात प्रथम येतो. कारण आपण भाज्यांच्या सेवनाने फक्त निरोगीच राहत नाही तर बर्‍याच आजारांवर मात करून लवकर बरं देखील होऊ शकतो. असंच काहीसं काकडी बद्दलही म्हटलं जातं. तसं पाहायला गेलं तर काकडी शिवाय कोशिंबीर हा पदार्थ अपूर्ण आहे आणि तसं का असू नये? कारण काकडीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन के आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम दर्शवितात. एकंदरीत काकडी ही एक अशी भाजी आहे की ज्याचा वापर आपण चटणी, कोशिंबीरी, सॅलेड तसेच सूपमध्ये सुद्धा करू शकतो.





एवढेच नाही तर काकडी त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. पण काकडीचे फायदे त्याच्या प्रमाणावर आणि वेळेवर अवलंबून असतात. जर आपण काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले किंवा चुकीच्या वेळी सेवन केले असेल तर यामुळे आपणास बरीच हानी पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊया यामुळे नेमकं काय व कोणाला नुकसान होतं?
काकडीचं अतिप्रमाणात सेवन



वाडवडिलांनी नेहमी असं म्हटलं आहे की कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणं वाईटच असतं. जरी काकडी हा अनेक गुणांचा खजिना असली तरीही जर तुम्ही काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते पोट फुगण्या सारख्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकतं. कारण काकडीत 95 टक्के पाणी असते. इतकेच नाही तर काकडीच्या बियांमध्ये कुकुरबिटिन नावाचा घटक आढळतो. या घटकामुळे आपल्याला अधिक वेळा लघुशंका होणं सुरू होतं. ज्यामुळे आपल्या शरीरातून लिक्विड किंवा द्रव पदार्थ अधिक प्रमाणात बाहेर पडू लागतात. असे झाल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू लागते. पण याव्यतिरिक्त काकडीचे सेवन योग्य प्रमाणातच केले तर ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. पण जास्त किंवा अतिप्रमाणात याचे सेवन केल्याने आपल्याला डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते.

No comments:

Post a Comment