Sunday, July 18, 2021

​डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठीचे उपाय

तुमच्या डोळ्याखाली अतिप्रमाणात काळे पणा असेल तर  ते कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहू 

  • डोळ्याखाली काळे पणा होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात .मानसिक तणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार, जास्त  कामाचा ताण  यामुळेही तुमच्या डोळ्याखालील काळे पणा  वाढू शकतो ही कारणे जर तुम्ही दूर केली तर डोळ्याखालील काळे पणा हळू हळू कमी होईल

  •  दुधाची साय दररोज डोळ्याखाली लावल्याने याचा फायदा होईल

  •  कच्चा बटाटा मधोमध कापून अर्धा तास डोळ्यावर ठेवावे नंतर ते  धुऊन टाकावे 

  • गाजर किसून लावल्यानेही काळपटपणा दूर होईल असे पंधरा ते वीस दिवस करावे

  •  काकडीच्या गोल चकत्या करून त्या डोळ्यावर ठेवाव्या त्यामुळे डोळ्याला थंडावा लागेल व काळा घेर कमी होईल

  • तसेच  गुलाब जल वापरल्याने ही डोळ्याखालचे काळे पणा दूर होईल

No comments:

Post a Comment