जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे होत असेल तर त्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहू
आटवलेले दूध घेऊन त्यामध्ये एका लिंबाचा रस टाकुन चांगले मिश्रण तयार करावे हे मिश्रण रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवावे व सकाळी धुऊन टाकावे या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होऊन चेहरा फ्रेश होईल
.शंभर ग्राम संत्र्याची साले चांगले वाळवून त्याचे पावडर करावे त्यामध्ये 500 ग्राम बाजरीचे पीठ आणि 12 ग्राम हळद टाकून भिजत ठेवावे नंतरं थोड्यावेळाने ते चेहर्यावर लावावे दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. काही दिवसातच तुमचा चेहरा सुंदर टवटवीत होईल
मसूर डाळीचे पीठ दुधामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावावे दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा हा उपाय सकाळ संध्याकाळ आठवडाभर केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होईल
बीट ,गाजर व टोमॅटो यांचा रस सारख्या प्रमाणात घेऊन रोज प्यावा हा प्रयोग दोन महिन्यापर्यंत केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम व सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल
गाळलेला लिंबाचा रस ,दोन तोळे गुलाब अर्क, दोन तोळे गलिसरिन व्यवस्थित मिसळून एका बॉटलमध्ये भरून ठेवावे रात्री झोपताना ते चेहऱ्यावर लावावेअसे वीस दिवस केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम, फुटकुळ्या कमी होईल नंतर तुमची त्वचा मऊ व सुंदर होईल
No comments:
Post a Comment