Thursday, July 15, 2021

चेहऱ्यावरचे काळे डाग व सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

   

चेहऱ्यावरचे काळे डाग व सुरकुत्या

            आपला चेहरा नेहमी सुंदर आणि ताजे तजेलदार हवा असे सर्वांना वाटते.कोणत्याही कार्यक्रमात जाताना आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटते .पण चेहर्‍यावर नेहमी काळे डाग व पिंपल्स असतात ते दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.  


  • ज्यांच्या चेहर्‍यावर नेहमी मुरूम,काळे डाग व फुटकुळ्या होतात त्यांनी एक उकडलेला बटाटा घेऊन सालासगट वाटून घ्यावा.

  •  त्यामध्ये काकडीचा रस व लिंबाचा रस टाकून त्याचे मिश्रण तयार  करून लेप लावावे 

  •  नंतर तासाभराने धुऊन टाकावे 

  • असा प्रयोग काही दिवस केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे डाग निघून जातील 

  •  चेहऱ्यावरचा काळसरपणा कमी करण्यासाठी एक एक चमचा  व्हिनेगार मध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे घ्यावे

  •  ते चांगले मिसळावे 

  • नंतर या मिश्रणाचा लेप पंधरा मिनिटे लावून ठेवावा. 

  • नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 

  • असा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करावा.

  •  चेहऱ्यावरचे डाग व सुरकुत्या कमी करण्यासाठी पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर  लावावा.

  •  नंतर दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा

  •  थोड्याच दिवसात चेहरा सुंदर दिसेल 

No comments:

Post a Comment