“आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे”
वरती खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे “
आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. जसे की दिवाळी ,दसरा, बैलपोळा, नारळी पौर्णिमा नागपंचमी, मकर संक्रांत असे विविध प्रकारचे सण साजरे केले जातात या सर्व सणांचे वेगळेवेगळे महत्त्व आहे.त्यातच श्रावण महिना सुरू झाला की वेगवेगळ्या सणांची चाहूल लागते. या सर्व सणांचा आनंद सर्वांनाच होतो.सर्वजणच या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चुकल्यास माफ करावे व ते आवर्जून सांगावे. त्यापूर्वी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
नागपंचमी केव्हा येते ?
श्रावण महिना हा सणांचा महिना आहे. सणांची सुरूवातच या महिन्यापासून होते .या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. यावेळी नागपंचमी 13 ऑगस्टला शुद्ध पंचमी या दिवशी आलेली आहे .या दिवशी नागाची पुजा केली जाते.
हा सण का साजरा केला जातो ?
या सणाच्या वेगवेगळ्या कथा आहेत . नागपंचमी हा सण वेदकाळापासून चालत आलेला सण आहे. प्राचीन काळी परिक्षित नावाचा राजा होता. एकदा तो जंगलात शिकार करण्यासाठी गेला असताना त्याला खूप तहान लागली होती. तेथे त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीत एक ऋषी तपश्चर्या करीत होते. ऋषीमुनी तपश्चर्या करीत असताना राजाने त्यांना पाणी मागितले. पण त्यांनी लक्ष दिले नाही याचा राजाला खूप राग आला .मग राजाने रागाने ऋषी च्या गळ्यात मेलेला साप टाकला. हे राजाचे कृत्य ऋषी चा मुलगा बघत होता. त्याला राजाचा खूप राग आला .त्याने राजाला शाप दिला व सांगितले
आजच्या सातव्या दिवशी तुला दक्षक नावाच्या सापा कडून सर्पदंश होईल त्यात तुझा मृत्यू होईल
या शापाने राजा खूप घाबरला, त्याने घडलेला सर्व प्रकार राजवाड्यात सांगितला.राजाला एक मुलगा होता. त्याने वडिलाला वाचवण्यासाठी एक खूप मोठा यज्ञ ठेवला .यज्ञ सुरू झाल्यानंतर सर्व नाग तेथे येऊ लागले व स्वतःला त्यात झोकून जीव देऊ लागले त्यानंतर सर्व नाग आस्तिक ऋषींना शरण गेले ही सर्व बाब अगस्ती ऋषी च्या लक्षात आली. त्यानंतर राजाच्या मुलाने सर्व नागांना क्षमा मागून पूजा सुरू केली. त्या दिवसापासून हा शुभ दिवस म्हणून नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी हा सण कसा साजरा करतात ?
आपल्या हिंदू संस्कृतीत भूतदया व सहिष्णूता यांना फार महत्त्व आहे. म्हणून हा महिना शाकाहारी म्हणून पाळला जातो. हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.सकाळी उठून हळद कुंकू व इतर पूजेच्या सामग्रीने नागाचे फणे पाटावर काढले जातात व त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. हा स्त्रियांचा सण असून गावातील मुली व स्त्रिया देवळात व वारुळा जवळ जाऊन पूजा करतात.पूजेसाठी लाही चा प्रसाद नेतात.. झाडावर ती उंच उंच झोके असतात नंतर स्त्रिया झिम्मा, फुगडी व झोका खेळतात
नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही कापू नये असे पथ्य पाळले जातात.नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात .त्यांना सुखी, आनंदी आणि निरंतर आयुष्य लाभो यासाठी कामना करतात .धन्यवाद

No comments:
Post a Comment