
सलमान खान- ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या आणि सलमान खान या दोघांमधला वाद सर्वश्रुत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर ही जोडी कधीही रुपेरी पडद्यावर दिसली नाही. सिनेमांमध्ये प्रेमी युगुलांची भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार मात्र बॉलिवूडमधल्या एका चित्रपटात बहिण भावाच्या भूमिकेत दिसणार होते.
२००० साली आलेल्या ‘जोश’ चित्रपटात शाहरुखऐवजी सलमानला विचारण्यात आलं होतं. मात्र काही कारणामुळे सलमानऐवजी शाहरुखची वर्णी या चित्रपटात लागली. ‘जोश’ हा चित्रपट काही रुपेरी पडद्यावर चालला नाही. पण, या निमित्तानं ऐश्वर्या आणि शाहरुख ही जोडी बहिण भावाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रथमच दिसली. या दोघांच्या भूमिकेचंही कौतुक करण्यात आलं.
या चित्रपटासाठी आमिर खानचाही विचार करण्यात आला होता मात्र काही कारणानं या चित्रपटाची स्टारकास्ट बदलत राहिली. अखेर शाहरुखच्या नावावर शिक्कामोहर्तब करण्यात आलं.
No comments:
Post a Comment